उस्मानाबाद -: राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी 2014 ते जुन 2014  या कालावधीत संपणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी 1 ते 7 टप्प्यातील प्रभाग रचना व आरक्षणाचा  कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    यानुसार सार्वत्रिक निवडणूक - लोहारा तालुक्यातील नागराळ (लो.) बेडकाळ आणि वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी, व फक्राबाद येथील ग्रामपंचायतीच्या मुदती संपतात.
    मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) निवडणूक नियम 1966 मधील नियम 2 अ प्रमाणे ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्य संख्या ठरविणे व नियम 3 नुसार प्रारुप प्रभाग रचना करणे- शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर,2013, प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकाऱ्यांने मान्यता देणे- मंगळवार, दि 24 सप्टेंबर, मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) नियम 1966 मधील नियम 4,4-अ, 4-अअ व 4- आरक्षणासाठी सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे, सोमवार, दि. 30 सप्टेंबर.  
              मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) नियम 1966 मधील नियम 2  अ नुसार प्रारुप प्रभाग, रचना, आरक्षणाबात नियम 5 मधील पोट नियम 2 चया नमुना ब अन्वये हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करणे- मंगळवार दि. 1 ऑक्टोबर,
    मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) नियम 1966 मधील  तरतुदीनुसार  व नियम 5 मधील पोटनियम 2 च्या नमुना ब मध्ये नमूद केल्यानुसार हरकती सादर करण्याची अंतिम तारीख- मंगळवार, दि 8 ऑक्टोबर.
           मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) नियम 1966 मधील  नियम 5 पेाटनियम 2 मधील तरतुदीनुसार नमुना ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे मागविलेल्या ज्या  हरकती व  सूचना प्राप्त झाल्या, त्यावर निर्णय घेण्याचा अंतिम तारीख- गुरुवार,दि. 17 ऑक्टोबर.  मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखुन ठेवणे ) नियम 1966 मधील  नियम 5 पोनियम 1 मधील  नमुना अ मध्ये अंतीम प्रभाग रचना,आरक्षित जागा वगैरेचा तपशिल प्रसिध्द करणे- गुरुवार, दि. 24 ऑक्टोंबर,2013 हा  आहे.           
 
Top