उस्मानाबाद : अभिनव संकल्पना राज्याला देणा-या उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाने आता महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवीन उपक्रम सुरु केला आहे. महिलांसाठी राखीव रिक्षा राज्यातील हा प्रयोग ठरणार असून या पहिल्या प्रयोगाला जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता शहारपूकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुक्रवार दि. 13 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. यापूर्वी एक गाव एक गणपती, पोलीस बंदोस्ताविना बैलपोळ्याची मिरवणूक, पोलीस जनमित्र कक्ष अशा अनेक संकल्पना उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाने राबविल्या आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता देशभरात चर्चिला जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या सुचविल्या जात आहेत. उस्मानाबाद पोलीस दलाने मात्र सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी महिलांसाठी राखीव रिक्षा ही अभिनव संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. शहरातील परवानाधारक ३० रिक्षा चालकांना वाहतूक शाखेने ओळखपत्र देवून या संकल्पनेत सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक रिक्षाचालकाचा भ्रमणध्वनी, संपूर्ण नाव, पत्ता, रिक्षाचा क्रमांक अशी इत्यंभूत माहिती पोलीस प्रशासनाने स्वतःकडे जमा केली आहे. हे ३० रिक्षाचालक महिलांना प्राधान्याने सेवा देणार आहेत. या रिक्षा चालकांची निवड करताना त्यांचे सामाजिक चारित्र्य, शिक्षण, वर्तणूक याचाही विचार करण्यात आलेला आहे.
अनेक वेळा रिक्षांमधून प्रवास करताना महिलांना छेडछाडीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. या संकल्पनेमुळे महिला व विद्यार्थिनींना राखीव रिक्षा उपलब्ध होणार आहेत. यासाठी लोकप्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने पुढाकार घेवून रिक्षासाठी लागणारे स्टिकर, ओळखपत्र याचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. शुक्रवारी सकाळी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर या अभिनव उपक्रमास प्रारंभ झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी व रिक्षाचालक उपस्थित होते.