उस्मानाबाद :- जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 16 सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या चारही मतदार संघातीव वगळणी केलेल्या मतदारांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्या असून विधानसभानिहाय आणि मतदानकेंद्रनिहाय त्याची यादीही याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या वगळणी बाबत काही आक्षेप असल्यास नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवावेत. मतदान करण्याच्या मुलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले आहे.
मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यावेळी डा. नागरगोजे यांनी हे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. चाकूरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, विनायक कुलकर्णी, कॅाग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, सुरेंद्र पाटील, शिवसेनेचे श्रीकांत देशमुख, सूरज शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंद्रजित देवकते, प्रशांत नवगिरे, बहुजन समाज पक्षाचे एस. आर. शेख, जलील खान पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डा. नागरगोजे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 53 हजार 556 मतदार वगळले गेले आहेत. यामध्ये उमरगा- 10 हजार, 921, तुळजापूर-13 हजार 383, उस्मानाबाद-22 हजार 616 आणि परंडा-6 हजार616 अशी वगळलेल्या मतदारांची संख्या आहे. याबाबत कोणास आक्षेप असल्यास त्यांनी ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, ज्या मतदारांचे फोटोमतदार यादीत समाविष्ट नाहीत व ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही अशा 1 लाख 68 हजार 465 मतदारांपैकी 65 हजार 596 इतक्या मतदारांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गोळा करण्यात आले आहे व त्यांची छायाचित्रे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत. उर्वरित 49 हजार 313 इतक्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याने त्यांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम सुरु आहे. याकामी सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या मतदान केंद्रनिहाय बुथ लेवल एजंट नियुक्त करुन त्यांना याकामी सहकार्य करण्यास सांगावे, अशी सूचना डा. नागरगोजे यांनी केली.
दिनांक 1 जानेवारी 2014 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नाही म्हणजेच ज्याची जन्मतारीख दिनांक 1 जानेवारी 1996 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी पात्र असल्याचे यावेळी डा. नागरगोजे यांनी सांगितले.
मतदार म्हणून नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना 6, मतदार यादीतील नाव नोंदणीसंदर्भांत आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7, मतदार यादीतील आपल्या तपशीलामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना-8 आणि विधानसभा मतदारसंघांतर्गत आपला पत्ता बदलला असल्यास नमुना 8-अ हा अर्ज भरुन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक पूर्वतयारीसाठी 20 व 21 सप्टेंबरला मास्टर ट्रेनर प्रशिक्षण
उस्मानाबाद :- विधानसभा मतदारसंघ स्तरीय मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण कार्यक्रम दि. 20 व 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सभागृहात होणार असून यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डा. के. एम. नागरगोजे हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. चाकूरकर यांनी दिली.
या प्रशिक्षणात सर्व उपजिल्हाधिकारी, चारही विभागांचे उपविभागीय अधिकारी, आठही तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हास्तरीय उपअभियंते, बांधकाम विभागाचे उपअभियंते यांना बोलावण्यात आले असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दोन दिवस हे प्रशिक्षण होणार असल्याचे श्री. चाकूरकर यांनी कळविले आहे.