उस्मानाबाद :- रेशीम कोषास बाजारपेठेत चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कोषाचे  उत्पादन घेवून आपला आर्थिक विकास साधावा. सध्या  जिल्ह्यातील रेशीम कोषास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.  केंद्रीय रेशीम मंडळाने जिल्हयात स्वतंत्र समुह विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी पी. एस. गणाचार्य यांनी  केले आहे.
      येथील जिल्हा रेशीम कार्यालयात जिल्ह्यातील रेशीम उद्योजक शेतक-यांच्या मासिक सभेत ते बोलत होते.  या सभेत  रेशीम कळंब तालुक्यातील शेतकरी विकास गुंड यांनी 100 अंडीपुजास  98 किलो कोषाचे उत्पादन केल्याबद्दल श्रीमती गणाचार्य यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व बक्षिस  देवून सत्कार  केला व नवीन व जुनी तुती लागवड, आंतर मशागत,अंडीपुंज पुरवठा, कोषउत्पादन व राष्ट्रीय कृषि विकास योजना, सी. डी. पी. योजना आदि योजनेची सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 
Top