उस्मानाबाद :- राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचा-यांनी कठोर परिश्रम घेवून प्रवाशांना दर्जेदार व तत्पर  सेवा दयावी, असे प्रतिपादन राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले.  मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त येथील राज्य परिवहन विभागीय कार्यालयात श्री. गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागातील तीन अपंग कर्मचारी श्री. बामणकर, श्री. जाधव व मनिषा पवार यांना स्कुटी वुईथ अँडप्शन या उपकरणाचे वितरण अध्यक्ष गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.                                                
        याप्रसंगी विभाग नियंत्रक प्रदिप खोबरे, वाहतूक‍अधिकारी हाश्मी, कामगार अधिकारी   गायकवाड, विधी अधिकारी  दिलीप मराठे, सुरक्षा अधिकारी नेहरकर, विभागीय वाहतूक अधिक्षक बिराजदार , सांख्यिकी अधिकारी पवार आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
       गोरे म्हणाले की, स्वामी रामानंदतिर्थ यांच्या नेतृत्वाखाली चिलवडी, देवधानोरा आदि गावातील  अनेक स्वातंत्र सैनिकांनी लढा देवून निजाम राजवटीच्या जाचातुन मराठवाडा मुक्त केला. त्यात अनेकांनी  हुतात्मा पत्करल्याने आज आपणास त्याची फळे चाखावयास मिळत आहेत. या स्वातंत्र्य सैनिकांची  महामंडळातील सर्वांनी जाणीव ठेवून प्रवाशांस वेळेत व तत्पर  दर्जदार सेवा देवून महामंडळाच्या उत्तपन्नात वाढ करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.   
 
Top