उस्मानाबाद : राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर,2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    दिनांक 1 सप्टेंबर 2013 रोजीची  मतदार यादी यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 चे पोटनियम 1 अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम 2 नुसार नमुना अ अ मधील निवडणूकीची नोटीस प्रसिध्दी -मंगळवार,दि.1ऑक्टोबर,2013,नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक -,दि.8 ऑक्टोबर (मंगळवार) ते दि.12 ऑक्टोबरपर्यंत (शनिवार) सकाळी 11 वाजेपासून ते दु.3 वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी -सोमवार,दि.14ऑक्टोबर रोजी 11 वाजेपासून, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख- गुरुवार,दि.17 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत राहील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी- गुरुवार, दि.17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर, मतदान दिनांक - रविवार,दि.27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7-30 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मतमोजणी सोमवार,दि.28 ऑक्टोबर,2013 रोजी जिल्हाधिकारी यांच्या  मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील. ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल मंगळवार,दि.29 ऑक्टोबर,2013 रोजी प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक राहील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
    यानुसार सार्वत्रिक निवडणूक- उमरगा तालुक्यातील येळी येथील सर्व प्रभाग क्रमांक, परंडा तालुक्यातील खासगावातील सर्व प्रभाग क्रमांक, पोटनिवडणूक- तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर प्रभाग क्रमांक- तीन (प्रवर्ग-ना.मा.प्र.स्त्री-1), तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे  प्रभाग क्रमांक -1 (सर्वसाधारण) तर कळंब तालुक्यातील कोथळा येथील  प्रभाग क्रमांक- 3 (ना.मा.प्र.)  अशा पोटनिवडणूका होणार आहेत.   
 
Top