उस्मानाबाद :  प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारित पथदर्शक फळपिक विमा योजना उस्मानाबाद जिल्ह्यासाठी द्राक्ष,डाळिंब (हस्त बहर),मोसंबी व पेरु या पिकांसाठी लागू केलेली आहे. सदर योजनेतंर्गत सन 2013-14 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना द्राक्ष पिकांसाठी विमा प्रस्ताव बॅकेत भरण्याची अंतिम तारीख दि.15 ऑक्टोबर-2013 ही असून डाळिंब द्राक्ष,डाळिंब हस्त बहर),मोसंबी व पेरु या पिकांसाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर2013 ही असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम द्राक्ष पिकासाठी 9 हजार, डाळींब (हस्त बहर) पिकांसाठी 6 हजार, मोसंबी पिकासाठी 3 हजार 600 व पेरु पिकांसाठी 1 हजार 800 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे बँकेत भरुन पिक संरक्षित करावे.
सन 2013-14 साठी अधिसूचित फळपिके,तालुके व महसूल मंडळे खालील प्रमाणे आहेत. फळपिकाचे नाव : द्राक्ष व डाळींब (हस्त बहार) अनुसूचित तालुका-उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, परंडा,कळंब,वाशी,उमरगा,लोहारा यातील सर्व महसूल मंडळे .
 मोसंबी पिकांसाठी तालुका-उस्मानाबाद -महसूल मंडळ -उस्मानाबाद ग्रामीण व जागजी. तुळजापूर- सर्व महसूल मंडळ. भूम- वालवड, माणकेश्वर,अंभी व ईट.,परंडा व वाशी तालुका- सर्व महसूल मंडळ तर लोहारासाठी लोहारा ही महसूल मंडळ असेल.
 पेरुपिकासाठी उस्मानाबाद, तुळजापूरसाठी सर्व महसूल मंडळे तर  भूमसाठी भूम,वालवड, अंभी व ईट असे राहील  परंडा, उमरगा,वाशी, लोहारा यासाठी सर्व महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.
संबंधित पिकांसाठी अधिसूचित केलेल्या तालुक्यामधील  महसूल मंडळातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल. या मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा,असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी /जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधवा,असे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
 
Top