उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    शनिवार, दि. 21 सप्टेंबर रोजी  सकाळी 8 वा. सोलापूरहून अणदूर,ता.तुळजापूर  येथे आगमन राखीव व मुक्काम. स. 11 वा. अणदूरहून गौडगाव, ता. बार्शीकडे प्रयाण. दु. 1-30 वा. गौडगाव येथून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. दु. 2 वा. येथील शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. त्यानंतर  सोईनुसार तुळजापूरहून अणदूरकडे प्रयाण आगमन, राखीव व मुक्काम.
    रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. अणदूर येथून ईट, ता. भूमकडे प्रयाण, स. 11 वा. ईट येथे आगमन व सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- ईट, ता. भूम, दुपारी 1 वा. ईटहून  शासकीय वाहनाने पुणेकडे प्रयाण.
 
Top