उस्मानाबाद :- सन: 2011-12 मध्ये बामणी, धारुर, वाडीबामणी सह याभागातील शेतक-यांचे पिक नुकसान झाले होते. त्यांना आज राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त्य व्यवसायमत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते मदत वाटपाचे धनादेश देण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी येथील आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतीक सभागृहाचे व घुगाव येथील सांस्कृतीक सभागृहाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर गुंड, सरपंच शिवाजी डोलारे, उपसरपंच सज्जन बायस, राहुल पाटील अशोक मगर आदी उपस्थित होते. या वेळी ताकविकी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास पालकमंत्री चव्हाण यांनी भेट देवून वैद्यकीय अधिकारी एन. एस. माने यांच्याकडून दवाखान्यातील उपलब्ध सोईसुविधांबाबत माहिती घेतली.
ताकविकी येथील कार्यक्रमात त्यांनी तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले खांडेकर व गणपतराव गवळी यांचा सत्कार श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सुधाकर गुंड, लक्ष्मण सरडे, अमर माने, राहुल पाटील, गौतम क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ सर्वानी करुन घेणे गरजेचे आहे. टंचाई परिस्थितीमध्ये शासनांने पुरेपूर मदत केली आहे. मागेल त्याला काम, पाण्याची सोय, गुरासाठी छावण्या व चारा देवून या परिस्थितीवर मात केली आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गंत आता गरीब जनतेला स्वस्तामध्ये धान्य उपलब्ध होणार आहे. जननी सुरक्षा योजनेमुळे त्या मुलीच्या आई वडीलांना मोठा आधार मिळणार आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेत अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे दाखले वाटप करण्यात आले. योवळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक भुसारी, उपअभियंता संजय पाटील, नायब तहसीलदार माने, ॲड. गणपती कांबळे, शिवाजी गुरव, चंद्रकांत कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.