उस्मानाबाद -: शिक्षण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबादच्या वतीने दिला जाणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार यावर्षी प्राथमिक (8), माध्यमिक (5) आणि विशेष (1) असा एकूण 14 शिक्षकांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुष्पक मंगल कार्यालय येथे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बसवराज पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.पद्मसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार, जि.प.चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व जि.प.सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर चौधरी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैजनाथ खांडके जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.