उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व सेवा संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय  खेळाडूंनी आगामी ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेत यश संपादन करण्याच्या दुष्टीने त्यांनी अद्यावत उपकरणांच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
    सदर योजना राबविण्याकरिता शासन नियुकत समितीद्वारे आंतराष्ट्रीय खेळाडूंची निवड करुन निवडलेल्या खेळाडूंच्या प्रस्तावाची शिफारस शासनास केली जाते.  शासनाकडून मान्यता आल्यानंतर आंतराष्ट्रीय खेळाडूंना कमाल 5  लाख मात्र मर्यादेपर्यंत आर्थिक सहाय्य  दिले जाते.
          अनुदाना करीता पात्रता: ऑलिंम्पीक/ राष्कुल्‍सपर्धा/ एशियन गेम्स/ तसेच एकविध खेळ संघटनेच्या जागतिक चषक/ कॉमनवेल्थ/ चॅम्पियनशीप इत्यादी स्पर्धेतील आठव्या क्रमाकावरल कामगिरी नोंदविणारे मान्यताप्राप्त वैयक्तिक क्रीडा प्रकारातील खेळाडू या अर्थसहायास पात्र ठरतील. परंतू अशा खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबाबतचे संबधित अधिकृत संघटनेच्या पदाधिका-यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
    अनुदानाच्या बाबी:- क्रीडा साहित्य, क्रीडा गणवेश आयात करणे, क्रीडा प्रशिक्षकांसाठी देशातंर्गात व देशाबाहेरील प्रवास, निवास, भोजन व प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, चित्रफिती, पुस्तके ईत्यादी.
    तरी महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, पहिला माळा  मध्यवर्ती इमारत, पुणे येथे किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम, उस्मानाबाद येथे संपर्क करुन विहित नमुन्यातील अर्ज क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र व इतर मागणी केलेल्या कागदपत्रांसोबत साक्षांकित केलेले उपरोक्त कार्यालयात सादर करावेत. सदर अर्ज विविध मान्यताप्राप्त राज्य क्रीडा संघटनांकडेही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
Top