उस्मानाबाद :- सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे अयुग आहे. आपण आधुनिक 21 व्या शतकात आपण वावरत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञनाने फार मोठी झेप घेतली आहे. आताची आधुनिक पिढी ही अत्यंत हुषार व चाणाक्ष आहे. तेंव्हा शिक्षक व पालकानी आपल्या पाल्यांच्या सुप्त कला गुणाचा व बुध्दीचा अंदाज घेवून त्यांना चालना दिल्यास ते उद्याचे महान शास्त्रज्ञ निर्माण होतील, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केंद्र शासनाच्या (विज्ञान व तंत्रज्ञान विभाग), नवी दिल्ली, राज्य शासनाच्या (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान संस्था, नागपूर, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबादच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने आयोजित नाविण्यपूर्ण जिल्हास्तरीय प्रदर्शन-2012-13 आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी औसाचे आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे ,उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, कृषी सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती प्रकाश चव्हाण, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विश्वनाथ खांडके, प्राचार्य सोमनाथ अकोसकर, दिलीप गरुड, श्रीमती आवटी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, सध्या नव-नवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. अनेक शोध लागत आहे. या विज्ञानयुगात आपण एका सेकंदात जग भ्रमण करु लागलो. ही किमया केवळ माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या यांच्या प्रेरणेनेच शक्य झाले आहे. त्यांनी 21 व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान युगाला चालना दिल्याने आपला देश प्रगती पथावर आहे. तेंव्हा सर्वांनी विज्ञान व तंत्रज्ञनाचे महत्व ओळखून विद्याथ्यांच्या सुप्त वैज्ञानिक गुणांचा शोध शिक्षक व पालकांनी घेवून उत्त्म वैज्ञानिक घडवावे, तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी सक्रीय रहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात खांडके म्हणाले की, शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत Insprie Award जिल्हयातील 6 ते 10 वर्गात शिक्षण घेत असलेल्या 912 शाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक साहित्य तयार करणे, मॉडेल्स, प्रतिकृतीसह तयार करण्याकरीता प्रत्येकी रुपये 5 हजार देण्यात आले असून त्यांनी तयार केलेल्या विज्ञान साहित्याची निवड करुन ते राज्यस्तराकरीता निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्याथ्यांच्या शैक्षणिक बुध्दीवर आधारीत गेल्यावर्षी राज्यस्तरावर 113 विद्यार्थी तर राष्ट्रीय पातळीवर 5 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती . यंदाच्यावर्षी या विज्ञान प्रदर्शनात 921 विद्यार्थी सहभाग असून 409 विद्यार्थींनीचा सहभाग असल्याचे सांगितले. हे विज्ञान प्रदर्शन दि. 2 सप्टेंबरपर्यत सुरु राहणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना हे प्रदर्शन दाखवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, बाबुराव राठोड, श्री. भोसले, साहित्यिक भांडेकर, बापूजी शिंदे, बाबुराव शेळके, मारुती सूर्यवंशी, सुधा साळुंके, प्रकाश राठोड, पार्वती घोडके, धनश्री धनगे यांचेसह जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थींनी, शिक्षक, पालक, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करुन प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. मुळज येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनीने स्वागत गीत सादर केले. यामध्ये अभय रेणके, प्रशांत गायकवाड, प्रा. शफी मुल्ला व पाटील सर सहभागी होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर. डी. जोशी, एस. टी. नलावडे, के. जी. धुरगुडे, आर. एस. लोमटे, एन. एन. निर्मल व त्यांचे सहकारी विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.