सोलापूर - , उस्मानाबाद,  अहमदनगर, सोलापूरसहअमरावती व  नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये हवामानाधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. प्रामुख्याने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग होणार असून . राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राबवण्यात येणार्‍या या योजनेत वरील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्‍यात आले आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी ज्वारी आणि गव्हासाठी हवामानाधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून भारतीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने राबवण्यात येणार्‍या या योजनेत पाच जिल्ह्यांचा समावेश असून ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांचा विमा उतरविता येईल. प्रामुख्याने तापमानातील बदल, आद्र्रता, अवेळी पाऊस या विविध हवामान घटकांपासून होणार्‍या पीक नुकसानीस विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
या हंगामातील पीक निरीक्षणासाठी जिल्ह्यात खास 91 ठिकाणी हवामान केंद्रे विमा कंपनीने कार्यान्वित केली आहेत. दरम्यान, यासाठी विमा हप्ता भरण्याची मुदत येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत आहे. सोलापूरसह अहमदनगर, उस्मानाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग होणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारी आणि गहू, उस्मानाबाद, अहमदनगरसाठी ज्वारी आणि हरभरा, अमरावती आणि नागपूरसाठी गहू आणि हरभरा या पिकांसाठी ही योजना असेल. हवामानाधारित पीक विम्यात आतापर्यंत द्राक्ष, डाळिंब, पेरू याच फळांचा समावेश होता. पण सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असणार्‍या रब्बी ज्वारी आणि गव्हाला ही योजना लागू नव्हती. आता ती लागू झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
Top