उमरगा :- गोवा येथे नुकतेच पार पडलेल्या14 वी राष्ट्रीय स्तरावरील सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत उमरगा येथील विद्यर्थ्यानी घवघवीत यश मिळविले आहे.
या स्पर्धेत गतवर्षीचा एशियन चॅम्पीयनशिप विजेता खेळाडू श्रीराज व्यंकटराव पोतदार याने सुवर्णपदक पटकाविले. तसेच नितीन सागर यानेही सुवर्णपदक पटकावले. कु. अश्रुता सातपुते हीने रौप्यपदक पटकाविले आहे. कु. अभिरूची नागरे हीने सहभाग नोंदविला. 19 वर्षाखालील मुली गटात माकणी येथील सरस्वती ज्युनियर कॉलेजची फतरूबी मुल्ला, प्रणिता गायकवाड, शितल अंबूरे, दिपाली लोंढे, यांनी सुवर्ण तर मिदान सौदागर याने कास्य पदक पटकाविले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात रघूनाथ पवार याने सुवर्णपदक पटकाविले. तर 14 वर्षाखालील मुलीच्या गटात जिजाऊ मेमोरियल इंग्लिश कुल लोहारा येथील कु. शिवकन्या स्वामी हीने रौप्य पदक पटकाविले.
या स्पर्धेत गुजरात, पंजाब, तमिळनाडू, जम्मु – कश्मिर महाराष्ट्र राज्यातील स्पर्धक खेळाडूंनी मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते. यशस्वी सर्व खेळाडूंचे अभिनंदन उस्मानाबाद जिल्हा सिकई मार्शल आर्टचे अध्यक्ष रफीक शेख, उपाध्यक्ष संगिता पवार, मार्गदर्शक धनराज पवार, शिवराज सुर्यवंशी, प्राचार्य डी.आर. राठोड, लक्ष्मण काजळे मुख्याध्यापक वाघमारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्यासह श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सरचिटणीस आ. बसवराज पाटील, सचिव रामचंद्र खरोसेकर,वामनराव सुर्यवंशी, प्राचार्य शिवानंद दळगडे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय सरपे, पर्यवेक्षिका ज्योती देशपांडे यांनी कौतुक केले.