उमरगा (लक्ष्मण पवार) -: जकेकुरवाडी (ता.उमरगा) येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारा सुरज चिट्टे या विद्यार्थ्यांची रांची (झारखंड) येथे होणा-या नॅशनल इंटर डिस्टी्रक्ट अथलेटीक्स असोशिएशन स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
सुरज बालाजी चिट्टे हा इयत्ता सातवीत शिकत असुन त्याने 600 मीटर धावणे या निवड चाचणीत यश मिळविले आहे. तसेच मिरा व्यंकट जमादार या खेळाडुने विभागीय पायका 400 मीटर धावणे स्पर्धेत एक मिनिट पंधरा सेंकदात पुर्ण करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूची निवड होताच त्यांचे क्रिडा शिक्षक सुरेंद्र वाले, संजय बदोले, मुख्याध्यापक अशोक गर्जे, गटशिक्षणाधिकारी सुधा सांळुके, विस्ताराधिकारी शोभा राऊत, केंद्रप्रमुख अर्जुन जाधव यानी अभिनंदन करुन कौतुक केले आहे.