उमरगा  (लक्ष्मण पवार) -: येथिल नगरपालिकेच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून उमरगा शहर हद्दवाढीवचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात पडला होता. मात्र तो हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर मंजुर झाल्याचे नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यानी बोलताना सांगितले.
  उमरगा नगरपालिकेची हद्दवाढ यापुर्वी 1987 साली झाली होती. सन 1998- 1999 यावर्षापासुन नवीन हद्दवाढ व्हावी म्हणुन  न.पा ने शासनदरबारी प्रस्ताव सादर केले होते.परंतु शासकीय लालफितीत हद्दवाढ रखडली होती.सध्या जुन्या हद्दीत लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त लोकसंख्या प्रस्तावीत हद्दवाडीत आहे. म्हणून नगरपालिकेला नवीन नागरीभागात सुविधा देण्याबाबत अडचणी होत होत्या.
      सद्यस्थितीतील काळाची ओळखून नगराध्यक्ष रज्जाक अत्तार यांनी शिवसेनेचे नेते प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौघुले,यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, नगरसेवक धनंजय मुसांडे, बालाजी सुरवसे, बळीराम पवार, यांच्या शिष्ठमंडाळाने  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळोवेळी भेटून उमरगा महसूल क्षेत्राचा हद्दवाडीत सामावेश व्हावा अशी, मागणी लावून धरली व ती मान्य कारीत हद्दवाढ फाइलवर स्वाक्षरी झाल्याची माहिती नगर विकास विभाग मंत्रालयातील उपसचिव शेटे यांनी भ्रमनध्वनीवरून सांगितल्याचे सांगितले. शेवटी नगराध्यक्षांनी पुढील वर्षाची गरज लक्षात घेवून सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी लक्ष केंद्रीत असल्याचे सांगितले.  
 
Top