उमरगा : शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त दि. १३ डिसेंबर पासुन ते ७ जानेवारी २०१४ या कालावधीत शिवनेरी चषक २०१४ या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कृ.उ.बा. स. उमरगाचे माजी सभापती जितेंद्र शिंदे यांच्यावतीने या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व चषक देण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील यांच्यावतीने द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपये व चषक, कृ.उ.बा. स. उमरगा सभापती सुलतान शेठ यांच्यावतीने मॅन ऑफ द सिरीज २१ हजार रुपये व चषक, नगराध्यक्ष अब्दुल रज्जाक अत्तार यांच्या वतीने सर्वाेत्कृष्ट फलंदाज ११ हजार रुपये व चषक, नगरसेवक आकाश शिंदे यांच्यावतीने सर्वाेत्कृष्ट गोलंदाज ११ हजार रुपये व चषक, नगरसेवक बालाजी सुरवसे यांच्यावतीने सर्वाेत्कृष्ट क्षेत्ररक्षक ११ हजार रुपये व चषक, नगरसेवक धनंजय मुसांडे यांच्यावतीने सर्वाेत्कृष्ट यष्टीरक्षक ११ हजार रुपये व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेसाठी ३१०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे नियम २०-२० क्रिकेट प्रमाणे असणार आहेत. नाव नोंदणीचा अंतीम दि. १३ डिसेंबर २०१३ हा असेल. नाव नोंदवण्यासाठी शिवनेरी संपर्क कार्यालय उमरगा, सहारा गिफ्ट सेंटर शिवाजी चौक उमरगा येथे संपर्क साधुन जास्तीत जास्त संघानी सहभाग नोंदवावा असे आवाहन युवासेनेच्यावतीने करण्यात आले आहे.