पांगरी  (गणेश गोडसे) :- 'प्रयत्ने वाळुचे तेलही गळे' याचा प्रत्यय कुसळंब (ता. बार्शी) येथील जिददी शेतक-यांकडे पाहिल्यावर येत असुन पाषणालाही पाझर फोडुन येथील कष्‍टकरी शेतक-यांनी उजाड माळरानावर बोरांच्या बागा फुलवुन बोरांच्या विक्रीतुन लाखो रूपये कमवुन शेती हा तोटयात चालणारा व्यवसाय नसुन शेतीतुन आर्थिक स्वलंबी होता येते हे दाखवुन देत वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. सलग तिन वर्ष पडलेल्या भीषण दुष्काळातही रक्ताचे पाणी करूण व टँकरदवारे पाणी बागांना पुरवुन जपलेल्या बोरांच्या बागा या वर्षी ऊत्पादक शेतक-यांचे पांग फेडण्‍याची शक्यता शेतक-यांमधुन व्यक्त केली जात आहे. सध्या बोरांना चांगला दर मिळत असल्यामुळे बोर उत्पादकांमधुन आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
     जिदद व चिकाटी असल्यास काहीही होऊ शकते याचाच प्रत्यय बार्शी तालुक्‍यातील कुसळंब परिसरामधील बोर उत्पादक शेतक-यांना आला असुन मुरमाड व एकदम हलक्या प्रतिच्या जमीनीत नाममात्र खर्चात एकरी दिड लाखापर्यंत ऊपन्न मिळवुन खेडयातील बोरे भारताची राजधानी दिल्ली येथे पाठवण्याची किमयाही येथिल शेतक-यांनी दाखवली आहे. र उत्पादकांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी उत्पादकांच्या चेह-यांवर हासु खुलले असुन 15 ते 35 रूपये प्रति किलो रूपयांपर्यंतचा दर यावर्षी उत्पादकांना मिळाला आहे. मात्र ग्राहकांना 30 रूपये किलो दराने बोरांची खरेदी करून चव चाखावी लागत आहे. चालु वर्षी शेतक-यांच्या कोणत्याच उत्पादनाला दर मिळत नसताना व शेतकरी त्यामध्ये भरडला जात असताना पाणी उपलब्ध असलेला बोर उत्पादक शेतकरी मात्र याला यावर्षी अपवाद ठरला असुन उत्पादन अतिशय चांगले मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
    बार्शी तालुक्याचा पुर्वभाग हा अवर्षणप्रवण म्हणुन शासन दरबारी नोंद असलेल्या कुसळंब परिसरातील जमीन हलक्या मुरमाड प्रतीची व तांबुस रंगाची असुन हया प्रकारची जमीन बोरांच्या बागेसाठी उत्तम आहे. कुसळंब परिसरात पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळे व शेतीसाठी कायम पाण्याचा स्त्रोत्र उपलब्ध नसल्यामुळे येथील शेतकरी बोर उत्पादनाकडे वळत असुन ऊस, द्राक्षे, हळद आदी पाण्यावर येणारी पिके या भागातील शेतकरी पाण्याअभावी घेऊ शकत नसल्यामुळे या भागात बोर पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पावसाच्या पाण्यावर येणारे हे पिक असल्यामुळे व कमी खर्चात येणारे पिक असल्यामुळे हलक्या प्रतीचा शेतकरी याकडे वळत आहे. कुसळंब परिसरात चमेली, कडाका, उमरान या जातींच्या बोरांच्या बागांची मोठया प्रमाणात लागवड आहे. यावर्षी प्रथमच चमेलीला 18 रूपये, कडाकाला 35 रूपये व उमरानला 10 ते 13 रूपये असा उच्चांकी दर मिळत आहे.
    हलक्या प्रतिच्या जमिनीत कुसळांच्या गवताचे प्रमाण खुप असतो. कुसळंब परिसरातही कुसळांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या गावाला कुसळंब असे संबोधले जाऊ लागल्याचे येथील जानकारांनी बोलताना सांगितले. अलिकडील काळात या गावाला बोरांचे कुसळंब असेही ओळखले जावु लागले आहे. कुसळंब गावाची पुर्वीची पैलवानांचे गांव ही असलेली ओळख गावातील होतकरू शेतक-यांनी आजही एकप्रकारे पुसू दिली नाही. लहरी निसर्ग, मनमानी प्रशासन, शासनाचे दुर्लक्ष आदी सर्व गोष्‍टींवर मात करत व या सर्वाशी दोन हात करत बोर उत्पादनातुन गांव व गावातील जनतेला स्वावलंबी बनवण्‍यात आले. या गावच्या मधुनच मुख्य रस्ते जात असल्यामुळे गावच्या विकासाला व दळणवळणाला यामुळे चालना मिळाली आहे. गावातील प्रत्येक शेतक-यांकडे किमान दोन एकर तरी बोरांची बाग आहे. बोरांची बाग असणे हे येथील शेतक-यांच्या व जनतेच्या दृष्टीने मोठेपणाची बाब ठरत आहे. कसे का असेना शासनाच्या हाताकडे न बघता स्वतः धडपडुन जगण्‍याचा मार्ग शोधण्‍याचा प्रयत्न करणा-या कुसळंब येथील शेतक-यांची धडपड वाखानण्‍याजोगीच आहे. तरीही त्यांच्या प्रश्‍नांकडे कोणीतरी लक्ष देऊन ते सोडवणेही तितकेच गरजेचे आहे.
 
Top