उमरगा (लक्ष्‍मण पवार) : मुंबई येथील डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्‍पर्धा परीक्षेच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेमध्‍ये उमरगा येथील स्‍वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदीर या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
    ही स्‍पर्धा दि. 18 सप्‍टेंबर रोजी घेण्‍यात आली होती. याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. शाळेने गेल्‍या दहा वर्षापासून स्‍पर्धेत सहभागी होत यशाची परंपरा कायम राखली आहे. यात कौशिक महाजन, ओंकार जमादार, श्रीकृष्‍ण घंटे, अभिषेक कवठे, स्‍नेहल कोरे या पाच विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले असून या विद्यार्थ्‍यांची पुणे येथे होणा-या प्रात्‍याक्षिक परीक्षेसाठी निवड करण्‍यात आली आहे.
    यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन संस्‍थेचे अध्‍यक्ष मल्लिकार्जून दंडगे, कार्यवाहक डॉ. कपील महाजन, मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत महाजन, सदस्‍य शिवाजीराव वडणे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंखे, गटविस्‍ताराधिकारी शिवकुमार बिराजदार, विज्ञान विभाग प्रमुख टी.के. राठोड, विज्ञान मार्गदर्शक एस.बी. सगर, शाळेचे मुख्‍याध्‍यापक प्रकाश शास्‍त्री, महात्‍मा बसवेश्‍वर विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक किसन पवार, शिवाजी इंदारपूरकर, संजय कोथळीकर आदींनी केले आहे.
 
Top