उमरगा (लक्ष्‍मण पवार) : विद्यार्थ्यांनी जिद्‌दीने व चिकाटीने आभ्यास करून आपला सर्वांगिण विकास करून स्वत:चे अस्तित्व सिद्‌ध करून आपल्या गावाचे, शाळेचे, आई वडीलांचे व स्वत:चे नावलौकीक करावा, असे प्रतिपादन रोटरीचे 2015 : 16 चे प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे यांनी केले.
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाबका येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व ” यश शास्त्र “ या पुस्तकाचे वाटप सोहळा प्रसंगी डॉ. दिपक पोफळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दाबका येथील सरपंच व्यंकट पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिपक पोफळे, रोटे. डॉ. कपील महाजन, रोटरीचे माजी अध्यक्ष नितीन होळे, रोटे. मनीष सोनी, उपसरपंच प्रा. शौकत पटेल, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष राम पाटील, उस्मान कादरी, प्रा. डॉ. मोईन कादरी, रज्जाक कादरी, गुलाम महेबूब मुजावर, जाफर जमादार, मुख्याध्यापक रेणूके आदी उपस्थित होते. पै. अब्दुल रहीम कादरी यांच्या स्मरणार्थ एल. आय. सी. चे विकास अधिकारी मोहीब कादरी यांच्या वतीने दाबका येथील 104 शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना डॉ. पोफळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लहानपणा पासूनच अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी व समाजातील एक आदर्श नागरीक होण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करावे व शाळेचा नावलौकीक व्हावा असे आवाहन त्यांनी केले.
    यावेळी डॉ. महाजन म्हणाले की, जो व्यक्ति आपल्या यशाचे शिखर गाटतो त्या व्यक्तिस लहानपणा पासूनच उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळालेले असते, असे शिखर विद्यार्थ्याना गाठावयाचे असेल तर त्यांची अभ्यासासोबतच कादरी यांनी दिलेल्या पूस्तकाचे व महान नेते, व्यक्तीमत्व विकासाची पूस्तके वाचन करणे गरजेचे आहे. यासाठी जर विद्यार्थ्यांना कोणती गरज भासली तर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
    कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. शौकत पटेल यांनी केले, सुत्रसंचलन माळी यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री रेणूके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. जूबेर कादरी, तन्वीर मुजावर, जलील पटेल, चॉंद पटेल आदीसह शाळेतील सर्व शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांनी प्रयत्न केले.
 
Top