भूम -: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी भूम येथील नगरपालिकेच्या प्रांगणात मराठा आरक्षण महासभेचे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी आयोजन करण्‍यात आले आहे. या महासभेसाठी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
    झेप प्रतिष्ठान व निर्भया हेल्पलाइनच्या पुढाकाराने मराठा आरक्षण महासभेचे आयोजन केले आहे. या सभेतून मराठय़ांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा, अरबी समुद्रात शिवस्मारक व इंदू मीलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांची पुनर्बांधणी करावी, आदी मागण्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे. या महासभेला उपस्थित राहण्‍याचे आवाहन संजय पवार, अरुण गाडवे, नितीन क्षीरसागर, अँड. अमृता गाढवे यांनी केले आहे.
 
Top