उमरगा (लक्ष्मण पवार) :- उमरगा नगरपरिषदेच्या वतीने 12 व्या वर्षी यशस्वी रित्या भव्य पशुप्रदर्शनाचे आयोजित करून उत्साही वातावरणात सोमवार दि. 3 रोजी रात्री 7 वाजता बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
   यावेळी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे हे होते. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक एम. राजकुमार बाबुराव शिंदे, जि.प. सदस्य कैलास शिंदे, भाजपचे संताजी चालुक्य, माधव पावार, नेताजी गायकवाड, युवासेनेचे किरण गायकवाड, बाजार समीती सभापती सुलतान सेठ, महावीर कोराळे, बाबुराव (मामा) शहापूरे, शंकर शठे, पो.नि. सुनिज नागरगोजे, नगरसेवक आकाश शिंदे, नारायन सुरवसे, मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे, बलभीम येवते, डॉ. युवराज बिराजदार, डॉ. बाबासाहेब गोरे, पाटील डॉ. सुरेश पाटील, डॉ. धाणे, डॉ. नाकाडे, भास्कर साळुंके, प्रमोद कांबळे, डॉ. बालाजी मिरकळे, बळी पवार धनंजय मुसांडे, मधुकर घोडके, आदी मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी मार्गदर्शन करताना जितेंद्र शिंदे म्हणाले की, शासनाने नगरपरिषदेला पशुप्रदर्शन भरविण्यासाठी 20 ते 25 एकर जागा उपलब्ध करुन दिल्यास यापेक्षा चांगले प्रदर्शन भरविण्यासाठी व शेतकरी, पशुपालकांना चांगली सेवा देण्यासाठी सहकार्य होईल, असे सांगून शासनाकडे जमीन उपलब्ध करुन देण्याविषयी पत्र व्यवहार करुन मागणी करावे, असे सुचविले.
    यावेळी एक वर्षाखालील खिलार अदात गटात प्रथम क्रमांक परमेश्वर लिंबाळे, द्वितीय क्रमांक लक्ष्मण निकम, तृतीय क्रमांक प्रमोद शिवगीरे तर प्रोत्साहनपर बक्षीस तुकाराम निकम यांनी पटकाविला आहे.
  एक वर्षावरील आदात खिलार गटात प्रथम पारितोषक कै. भानुदासराव शिंदे, स्मनार्थ धनराज करनुरे भगतवाडी, द्वितीय क्रमांक शाहुराज घोटाळे, तृतीय क्रमांक राचमले कसगी तर प्रोत्साहनपर बक्षीस बाबू चव्हाण यांनी पटकाविले. खिलार दोन दात गटात प्रथम क्रमांक रामलिंग राजमाने, मल्लीनाथ नंदरगे, तृतीय पारितोषिक अनंतसिंग गहिरवार तर प्रोत्साहनपर प्रथम पारितोषिक वामन गडदे, द्वितीय बाबुराव शिंदे, तृतीय हुसेनी नंदीवाले व राजू कटके यांनी पटकाविले. खिलार सहादात गटात प्रथम ऋषीकेश साळुंके, द्वितीय अमोल मिरकले, तृतीय मोतीराम बुवा तर प्रोत्साहनपर राजेंद्र चंडके यांनी पटकाविले. खिलार गाय गटात प्रथम क्रमांक विकास पुजारी, द्वितीय श्रीपती टकले, तृतीय सुनिल बिराजदार, प्रोत्साहनपर सचिन पुजारी यांनी बक्षीस पटकाविले. संकरीत गाय गटात ओम सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. संकरीत दुभती गाय गटात प्रथम गणेश गुडडा, द्वितीय सुनिल पुजारी, तृतीय संजय कलशेटटी यांनी पटकाविला. उस्मानाबादी शेळी बोकड गटात प्रथम पारितोषिक बालाजी सोनटक्के यांच्या पशुनी पटकाविला.
    यावेळी अमजद बेपारी, मेहराज कुरेशी, खययुम बेपारी, मुसा बेपारी, अली बेपारी, विजुअप्पा मिटकरी, कमलाकर परसे, जालींधर वाघमारे, अशोक चव्हाण, गोविंद दळवेकर, राजेंद्र वाघण्णा, राम जाधव, हरी चेंडके, राजू मंगणे, राम पौळ, मोहन पवार, वामन पवार, हिरा पवार आदी व्यापारी मोठया संख्येनी उपस्थित होते.
    नगरपरिषदेच्यावतीने बिरुदेव मंदीर परिसरात पशुप्रदर्शन यात्रा यशस्वी करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी शेषेराव भोसले, मदार शेख, जहीर फुलारी, करबस शिरगुरे, बाबुराव सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top