उमरगा (लक्ष्मण पवार) :- उमरगा तालुक्यातील गुळगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम योजना 2014 चे शुभारंभ आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला.
  यावेळी उमरग्याचे नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव शहपूरे, नापयब तहसीलदार बी.पी. गायकवाड, गुलाब शेख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील चेअरमन मधुकर तळभोगे, तलाठी आवारे शिवाजी चव्हाण, राजपाल चव्हाण, किसन गायकवाड, जयपाल कांबळे, कोरेगावचे सरपंच हंगळे, कोरेगाववाडीचे एकनाथ हांडे, बाळासाहेब चव्हाण, अमर आमशेट्टे ओम बिराजदार, यांची उध्दव जगताप, ज्ञानेश्वर तळखेडे, शिवाजी कांबळे, राम व्हनाळे, अदीसह सौ. सुमन गायकवाड, सौ. कांबळे, सौ. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोविंदराव तळभोगे हे होते.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन शिधापत्रिका व धान्याचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वीकरिता स्वस्त धान्य दुकानदार चंद्रकांत चव्हाण, सचिन चव्हाण, पंकज जगताप, गणेश कोकरे, बालाजी पाटील, सुधाकर बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top