लोहारा :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे  लोहारा येथे बांधण्यात येणा-या  नविन बसस्थानकाचे भुमिपूजन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते व खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे राहतील.
     प्रमुख पाहूणे म्हणून गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष  आ. राहूल मोटे, जि. प. चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, सतिष चव्हाण, दिलीपराव देशमुख, विक्रम काळे, बसवराज पाटील, ज्ञानराज चौगुले, सरपंच नसिमाबी बागवान राहतील.
    सदरील कार्यक्रम लोहारा बसस्थानक, लोहारा या ठिकाणी आयोजिण्यात करण्यात आला असून या कार्यक्‌रकमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य परिवहन मंडळ औरंगाबादचे प्रादेशिक व्यवस्थापक व राज्य परिवहन मंडळ उस्मानाबादचे विभाग नियंत्रकांनी केले आहे.       


पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते  वाशी बसस्थानकाचे भुमीपूजन
वाशी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे  वाशी येथे बांधण्यात येणा-या  नविन बसस्थानकाचे भुमिपूजन सेाहळा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते व खासदार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या उपस्थितीत रविवार,दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5  वाजता होणार आहे. या कार्यक्‌रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे राहतील.
    प्रमुख पाहूणे म्हणून गोदावरी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष  आ. राहूल मोटे, जि. प. चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, सतिष चव्हाण, दिलीपराव देशमुख, विक्रम काळे, बसवराज पाटील, ज्ञानराज चौगुले, सरपंच प्रशांत  बावगे राहतील.
   सदरील कार्यक्रम वाशी बसस्थानक, वाशी या ठिकाणी आयोजिण्यात आला असून या कार्यक्‌रकमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य परिवहन मंडळ औरंगाबादचे प्रादेशिक व्यवस्थापक व राज्य परिवहन मंडळ उस्मानाबादचे विभाग नियंत्रकांनी केले आहे.
 
Top