उस्मानाबाद :- नागरिकांना भाजीपाला, फळे किमान दरात उपलब्ध व्हावेत आणि शेतक-यांनाही त्यांचा शेतमाल थेट विक्री करता यावा, यासाठी दिनांक 12 जुलै रोजी परंडा येथे आठवडी बाजार जागेमध्ये या शेती माल थेट विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते संपन्न झाले
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतक-यांचा थेट शेतमाल विक्रीसाठी आणता येईल. याचा शेतक यासह सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.यामध्ये रोजच्या रोज ताजा भाजीपाला कडधान्य उपल्बध होईल या सुविधेचा जास्ती जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सागितले. याप्रमाणेच या उपक्रमासाठी प्रत्येक नगर पालिकेनी पुढाकार घेवून असे विक्री केंद्र सुरु करण्यात यावेत असे निर्देश दिले.
या प्रसंगी भुम, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत तहसिलदार स्वरुप कंकाळ जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव न. प. मुख्य अधिकारी समीर भुमकर यांच्यासह शेतकरी व नागरीक उपस्थित होते.