येरमाळा :-  प्रधानमंञी उज्ज्वला योजना अंतर्गत येरमाळा येथे एस.सी.,एस.टी.अंत्योदय कार्ड लाभार्थी महिलांना महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचीव  महेश पाठक यांच्या हस्ते लाभार्भी महीलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
दि. २८ जुलै रोजी दु. २ वा. येरमाळा येथिल अार्शिवाद भारत गॅस ग्रामीण वितरक येथे प्रधानमंञी उज्ज्वला योजनेअंतर्गत एस.सी.,एस.टी. तसेच अंत्योद्य पाञ लाभार्थींना केवळ १०० रु. यात गॅस कनेक्शन चे वाटप अन्न,नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव महेश पाटक व जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे ,अार्शीवाद गॅस वितरक धनंजय बारकुल यांच्या हस्ते करण्यात अाले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ.संजय कोलते, सहायक जिल्हानियोजन अधीकारी एस.एस. रेड्डी,,महावितरण चे अधिक्षक अंभीयंता पाटील,कळंब उपविभागीय अधिकारी सौ.चारुशिला देशमुख,तहसीलदार अशोक नांदलगावकर,नायब तहसिलदार सौ.पठाण मॅडम,कळंब प.स. गटविकाधीकारी काळे साहेब यांच्या संबधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थीत होते. यावेळि पाटक साहेब म्हणाले, सध्याची पर्यावरण स्थीती पाहता व सामान्याच्या अारोग्याची काळजी लक्षात घेता घरोघरी गॅस चा वापर असने अावश्यक अाहे तसेच विजेची बचत देखील केली पाहीजे असे सांगत LED बल्बचा करावा अशी सुचना केली. यावेळी या कार्यक्रमासाठी ग्रामस्त,लाभार्थी, संबधीत प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..

 
Top