उस्मानाबाद : पीक विमा भरून घेण्यास १५ ते २० मिनिटाचा लागणारा वेळ लक्षात घेता जिल्हा बँकेसह इतर बँकांनी फक्त कर्जदार शेतकऱ्यांचाच पिक विमा भरून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इतर खाजगी ठिकाणी पिक विमा भरण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यां आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. हि बाब आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी श्रीमती जोशी मॅडम यांच्याशी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याबाबत चर्चा केली. श्रीमती जोशी मॅडम यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा करण्याचे मान्य केले होते.
    गेल्या वर्षी जिल्हा बँकेने शेतकर्‍यांचे ऑफ लाईन अर्ज स्वीकारले त्यामुळे सर्व शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेता आला होता परंतु या वर्षी कंपनीने ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केल्यामुळे सर्व शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेता येणार नसल्याने फक्त कर्जदार शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला होता. परिणामी बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पिक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांना खाजगी संगणक धारकाकडे जावे लागत असून त्यासाठी आर्थिक भार देखिल सहन करावा लागत आहे. 
    ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी श्रीमती जोशी मॅडम यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे कंपनीने नवीन सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले असून  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा बँकेला कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक १९जुलै पासून सर्वच शेतकर्‍यांचा उस्मानाबाद जिल्हा बँकेत पिक विमा भरून घेतला जाणार आहे. बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेण्यासाठी २४ जुलै अंतिम मुदत असल्याने कर्जदार शेतकर्‍यांनी गर्दी न करता २४ जुलै पर्यंत बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेण्यासठी सहकार्य करावे व कर्जदार शेतकर्‍यांनी २५ जुलै पासून ३१जुलै पर्यंत पिक विमा भरून घ्यावा जेणेकरून सर्व शेतकर्‍यांचा पिक विमा भरून घेता येईल असे आवाहन मा. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
 
Top