उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील युवकांनी माजी कॅबिनेट मंत्री तथा विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करुन युवक काँग्रेसच्या शाखेचे थाटात उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर खताळवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे शुभारंभ आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते ‍रविवार दि. 22 जुलै रोजी करण्यात आले. 
    यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, रोहित पडवळ, मुजीब पठाण, बलभीम जाधव, अश्रुबा माळी, सुभाष हिंगमिरे आदीजण उपस्थित होते. 
     शिंगोली येथील अमित वाघमारे, सुरेश झेंडे, सचिन वाघमारे, राजु वाघमारे, अक्षय गायकवाड, रमेश काळे, बालाजी लोंढे, नितीन वाघमारे, शिवाजी शितोळे, राम वाघमारे, विनोद वाघमारे, रमेश तुपेरे, महादेव थोरात, गणेश वाघमारे, विक्की ओव्हाळ, नितीन शिंदे, संजय वाघमारे, दिलीप शिंदे, नितीन शितोळे, सुहास वाघमारे, बालाजी तळभंडारे, किरण कदम, श्रीराम क्षिरसागर आदी युवकांनी काँगेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 
 
Top