उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथील सुपुत्र तथा  सध्या  मुंबई महापालिकेत  दुय्यम  अभियंता  या पदावर  कार्यरत  असणारे  श्री. शाम उध्दवराव शिंदे  यांनी 1 जुलै  रोजी  ऑस्ट्रिया येथे झालेल्याजागतिक  विश्व ट्रायथेलाॅन  स्पर्धेत *आयर्न  मॅन* हा किताब पटकावला
      1 जुलै  रोजी ऑस्ट्रिया  येथे झालेल्या  विश्व ट्रायथेलाॅन  स्पर्धेसाठी विविध  देशांतील  3000 स्पर्धक या स्पर्धेसाठी सहभागी  झाले होते.  या स्पर्धेत 3.8 कि.मी. पोहणे,  180 कि.मी. सायकलिंग,   42 कि.मी. धावणेसाठी अभियंता श्री शाम शिंदे  यांनी  हे अंतर 14 तास 58 मिनिटात  पार पाडुन आयर्न  मॅन  हा किताब पटकाविला
      मुंबई  येथील  महापालिकेत दुय्यम  अभियंता या पदावर  कार्यरत असलेल्या  शाम उध्दवराव शिंदे  यांना लहानपणापासूनच  पोहणे, धावणे या सारख्या  क्रिडा प्रकारात  आवड असल्याने त्यांनी ती आवड नौकरी  करत आजतागायत  जोपासली आहे.  त्यांचे शालेय  शिक्षण उस्मानाबाद  येथील  श्रीपतराव  भोसले हायस्कूल, मल्टीपरपज  हायस्कूल  येथे  तर महाविद्यालयीन शिक्षण तुळजापूर  येथील  तुळजाभवानी अभियात्रीकी  महाविद्यालयात झाले आहे.
            ऑस्ट्रिया झालेल्या  या स्पर्धेसाठी  शाम शिंदे  यांना  पत्नी सौ.  नुतन, वडील  उध्दवराव  शिंदे, आई,  भाऊ श्रीकांत सासरे नेताजी साठे यांनी प्रोत्साहन दिले  होते. अतिशय  खडतर प्रतिकूल  परिस्थितीवर मात करून  आयर्न  मॅन हा किताब  पटकावत उस्मानाबाद  जिल्ह्य़ाचा झेंडा  अटकेपार फडकावला.  या त्यांच्या  यशामुळे सर्वत्र कौतुक केले  जात  आहे


 
Top