उमरगा : लक्ष्मण पवार
शरीर नश्वर आसल्याने गुरूप्रती आदरभाव,श्रध्दा व प्रेम असल्याशिवाय गुरूभक्ती साध्य करता येत नाही गुरूचां आशिर्वाद मिळविण्यासाठी सदगुरुचे नामस्मरण संकिर्तणात तल्लीन झाल्यास गुरू भक्तांच्या अंतरीचा पवित्र दिवस येतो या दिवसाचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे. असे म्हणून साधकाच्या साधनेची वाटचाल ही सदगुरूच्या सुक्ष्म द्रष्टीतून होत असते या तुलनातीत क्रपा दानातून उतराई तथा गुरू भक्तीचे महत्व जाणण्याचा मंगलमय दिवस उत्साहाने सर्वानी साजरा करायला पाहीजे असे आवाहन ह.भ.प. उल्हास महाराज सुर्यवंशी यांनी केले.
ते उमरगा तालुक्यातील तुरोरी जवळील पुर्वेकडील अचलबेट देवस्थान येथे श्री गुरु पोर्णिमेनिमीत्त श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था क्षेत्र आळंदी येथील प्रसिद्ध अध्यापक ह.भ.प. आध्यात्मभुषण उल्हास महाराज सुर्यवंशी यांचे सुश्राव्य असे किर्तन मोठया उत्साही वातावरणात हजारो भक्तांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 27 रोजी रात्री 7 ते 9 या वेळेत संपन्न झाले.
यावेळी देवस्थान चे ह.भ.प. हरी लवटे महाराज, भिम महाराज, ह.भ.प.प्रशांत घोडके महाराज, संजय राठोड महाराज, नरसिंग लवटे महाराज, दादा सुर्यवंशी महाराज, दत्ता महाराज, राजू माळी महाराज, जिल्हा बँंकेचे वसुली अधिकारी पंडीतराव मुळे महाराज, जनार्धन भोसले महाराज, तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर माशाळकर,बंडू नेलवाडे,विठ्ठल तेलंग, निळकंठ जमादार, बाळू जांभळदरे आदी. यांच्यासह असंख्य किर्तणकार महाराज व मान्यवरांची उपस्थिती होती.
अचलबेट देवस्थान येथे सकाळ पासून हजारो भक्त गण गुरु पोर्णिमेनिमीत्त सदगुरू काशिनाथ महाराज व पुज्य वैराग्यमुर्ती उज्वलांनद महाराज यांच्या पावण भुमीत देवदर्शनासाठी येत होते.
गुरूवर्य उज्वलांनद महाराज पालखी सोहळा समाधी मंदीर एकंबा ता. बस्वकल्याण येथून सकाळी 9 वा. सतत सहाव्या वर्षी गुरूप्रती निखळ भक्तीचा अलौकिक आनंद सर्व जडजिवांना आपल्या परमार्थीक सत्येतून प्रकट केल्याने दहा हजार भावीक महिला पुरुष भक्त गण एकंबा येथून उजळंब,मळगी,चिंचकोट,तुरोरी यामार्गाने अचलबेट देवस्थान येथे सायंकाळी 5 वा. पोहचली. प्रत्येक गावात पालखीचे स्वागत फटाक्यांच्या आतशबाजीने करण्यात आले.
तुरोरी येथून भक्त अचलबेट देवस्थान कडे येताना राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतूक करण्यात आली होती. शेवटी अर्धातास वाहतूक रोखून पायी चालत जाणाऱ्या भक्तांची सोय करण्यात आली. देवस्थान येथे पालखी येताच गुलाब पुष्पाची उधळण व फटाक्यांची आतशबाजी करून स्वागत केले.
चलबेट देवस्थान येथे हजारो भाविक भक्त भक्ती रसात तल्लीन झाले होते. दिवसभर गुरूप्रती आदरभाव व्यक्त करण्याकरीता व आशिर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताना मोफत महाप्रसाद वाटप करण्यात आले. हा महाप्रसाद महाराष्ट्र- कर्नाटक- आन्ध् प्रदेश राज्यातील दोनशे गावातील सरपंच व सर्वच भक्तांनी दिवसभर उपस्थित राहून रात्री उशीरापर्यंत वाटप सुरू केले. तदनंतर रात्री हरी नित्य नियमाचे जागर संपन्न झाले.