उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील सांगवी येथे जिल्हा
परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते गावातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
शुक्रवार दि. 13 जून रोजी करण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद पंचायत समितीचे
सभापती बालाजी गावडे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वामी आदीसह ग्रामस्थ मोठया
संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर कामेगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. पाटील
यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व
त्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे
आश्वासन दिले.