उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रथम मुस्लीम पायलट होणारा व शहराचे नाव प्रकाशमान करणाऱ्या पायलट अझरूद्दीन मोइनोद्दिन काझी यांचा अन्नपुर्णा ग्रुप तर्फे सन्मानचिन्ह देवून त्यांच्या वडिलांसोबत सत्कार करण्यात आला. अझरूद्दीन यांनी सुरुवातीचे काही शिक्षण उस्मानाबाद मधील फ्लायिंग क्लब येथे घेवून पुढील शिक्षण न्यूझीलंड येथे पूर्ण केले व आता ते इंडिगो एअरलायीन्स FIRST OFFICER या पदावर रुजू झाले असून AIRBUS A320 हे २०० आसनी क्षमता असलेले प्रवासी विमान चालवतात. यासाठी त्यांनी DGCA तर्फे घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण केल्या तसेच न्युझीलंड येथे २०० तासांचे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले.
या प्रसंगी अझरूद्दीन त्यांचे वडील मोइनोद्दिन काझी व अन्नपुर्णा चे सर्व सदस्य उपस्थित होते.