गांधींच्या सेवाग्राम आश्रमात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांची संवाद, समन्वय व वार्षिक नियोजन बैठक संपन्न
धाराशिव जिल्हा संघटक म्हणून मारुती बनसोडे यांची नियुक्ती
धाराशिव,दि.०९:
नशाबंदी मंडळाच्या ३६ जिल्हा संघटकाचे संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन यात्री निवास, सेवाग्राम आश्रम, वर्धा याठिकाणी करण्यात आले होते.
या ठिकाणी संघटकांच्या कार्याचे नियोजन करुन साहित्यात पोस्टर, पत्रक, महामानवाचे विचारांचे पुस्तक, व्यसनमुक्ती वरील सापशिडी देण्यात आली. यावेळी संघटक बैठकीचे उद्घाटन नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक/ चिटणीस अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बॉस्को डिसुझा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष वर्धाचे डॉ. नितिका व त्यांची टिम ,
३६ जिल्ह्यातील संघटक, ६ विभाग प्रमुख, नशाबंदी मंडळाचे कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजन वेळूकर यांनी संस्था चालवतांना कशा पद्धतीने फंड गोळा केला पाहिजे, त्यासाठी संस्थेचे प्रेझेंटेशन कसे असावे, यावर मार्गदर्शन केले. तसेच नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक व चिटणीस मडामे यांनी केले, वर्षभरात आपल्या जिल्ह्यात विशेष कार्य केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांना गोल्डन मेडल देऊन तर नागपूर जिल्हा संघटक गौरव आळणे यांना सिल्वर मेडल तर पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांना ब्रान्स मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विभागीय संघटक प्रमुख म्हणून उत्तम काम केल्याबद्दल प्रथम क्रमांक पुणे विभाग प्रमुख अॅड. सुरेश संकटे व त्यांची टिमला सन्मानचिन्ह व रोख रक्कम तर दुसरा क्रमांक कोकण विभाग प्रमुख दिशा कळंबे व त्यांची टिम यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
३६ संघटकानी आपला परिचय देऊन विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली. तसेच अहवाल लेखन, ऑनलाइन बैठकीविषयी सूचना तसेच कल्याण यात्रा विषयी सूचना मुख्य संघटक यांनी दिल्या. संघटकांना व्यसनमुक्तीची किती माहिती आहे? हे जाणून घेण्यासाठी बोल बच्चन हा खेळ सरचिटणीस यांनी घेतला.
त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात किमान ३ शाळा व ३ कॉलेज तंबाखू मुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबवून नशा मुक्त भारत अभियानास अधिक बळ देण्याचा संकल्प करण्यात आला.
बॉस्को डिसुझा यांनी नवीन अंमली पदार्थांची ओळख! या विषयावर मार्गदर्शन केले. तर सुजाता सावंत यांनी जिल्ह्यात फंड कशाप्रकारे उभा करता येईल यावर मार्गदर्शन केले. बैठक समारोप प्रसंगी राज मरापे यांनी भेट देऊन संघटकाचे कौतुक केले व सदिच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते प्रत्येक संघटकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन शिबिराचा समारोप झाला.
तीन दिवसीय बैठकीत धाराशिव जिल्हा संघटक म्हणून मारुती बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली. *याप्रसंगी मारुती बनसोडे यांनी जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे कार्य अधिक जोमात होण्याकरिता स्वतः प्रयत्नशील राहून तसेच प्रशासनाची मदत घेऊन, जनसामान्या सहभागी करून घेऊन व्यसनमुक्त धाराशिव जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प केला.