Saturday, 24 August 2013

जळकोट-मानमोडी रस्त्याची दुरावस्था

नळदुर्ग -: तुळजापूर तालुक्यातील जळकोट-मानमोडी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून गल्या दहा वर्षापासून एकदाटी रस्त्याची डागडुजी झाली नसल्याने प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे.
    जळकोट-मानमोडी हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रखडला आहे. रस्त्यावर पूर्णत: खडडे पडले असल्याने खडडयाचा रस्ता म्हणून ओळखला जात आहे. मानमोडी हे गाव द्राक्ष व भाजीपाला पिकवण्यात आघाडीवर असल्याने रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. सध्या नागरीक व प्रवासी नादुरुस्त रस्त्यामुळे हैराण झाले आहेत. डांबरीकरणाचा रस्ता असल्याने हा रस्ता नव्याने बनवावा लागले. उस्मानाबाद जि.प.च्या बांधकाम उपविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पक्का रस्ता करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Labels: