लोकसहभागातून गाव जलयुक्त शिवार करण्याचे आवाहन : डॉ. सिंह
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यात पर्जन्यमान चांगल्याप्रकारे असून सद्यस्थितीत पाणी आहे. भविष्यात दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावक-यांनी आपल्या गावच्या शिवारातील सर्व पाझर तलाव, नाले, व सिमेंट बंधा-याचे खोलीकरण करण्यासाठी आणि पाण्याचा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ग्रामसभा घेऊन ''गाव'' जलयुक्त शिवार करण्यांसाठी गावकऱ्यांनी संकल्प करण्या
मंगरुळ ता.तुळजापूर येथील दिलीप डोंगरे सांस्कृतिक सभागृहात जलयुक्त शिवार अभियान जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कुलदीप (धीरज) पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.उबाळे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यु बोधवड, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार श्रीरंगी, गटविकास अधिकारी खिल्लारे, वरीष्ठ भूजल सर्वेक्षक प्रमोद रेड्डी, सुनील जोशी, सोनाली पाटील, सतिष डोंगरे, मुकूंद डोंगरे, हरिश जाधव, विजय सरडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.सिंह म्हणाले की, तालुक्यात जलयुक्त शिवार अभियांनातर्गत कामे सुरु आहेत. आपल्या भागातील सिंचन क्षमता वाढावी. पाणीचे योग्य नियोजन करुन पाणी जमिनीमध्ये पूर्नरभरणाद्वारे जिरविणे, सिंचनामुळे गावातील शेतकरी व नागरिकांना याचा लाभ होण्यासाठी सर्व प्रकारची तंटा बाजूला ठेवून गावक-यांनी एकत्र येणे, पर्जन्यमानाद्वारे मिळणारे पाणी त्याचा वापर लक्षात घेऊन कमी पाण्यात येणारे पिक घेणे, जुने जलस्त्रोत पुर्नजीवीत करणे, भूजल सर्वेक्षण विभागाचे सहकार्य घेण्याबाबत सांगून पुढे म्हणाले की, पाण्याची बचत ही काळाची गरज असून गावातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार मधुकरराव चव्हाण यावेळी सांगितले की, सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी तालुका जलशिवार करण्यासाठी युवा पिढीने पुढे येऊन गावातील तलाव, बंधारे व नाला यांचे गाळ काढून पाणी पातळी वाढविण्याचा प्रयत्न करावा.कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारी पिके घेण्याचा विचार करावा.भविष्य पर्जन्यमान वाढविण्यासाठी वृक्षलागवड करण्याचेही आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात पाणी बचतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. गावातील कामे करण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा घडवून आणावी. या जलयुक्त शिवार योजनेत लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून आपले गाव जलयुक्त गाव करावा. गावातील विहिरी व बोअरवेलचे स्वत: पासून पूर्नभरणाचे काम सुरु करावे. गाव पातळी वरीलकामांचा आढावा घेऊन गावातील नागरिक व शेतक-याकडून नाममात्र वर्गणी घेऊन पाणीदार गाव करावे. आपल्या गावातील शिवाराचे नंदनवन करण्यासाठी प्रयत्न करावा,असेही शेतकरी व नागरिकांना आवाहन केले.
Labels: Naldurg

<< Home