उस्मानाबाद :-  संगीत क्षेत्रातील तरुण व गुणी कलाकारांना शोधून  त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकाशवाणीच्या विविध  केंद्रावर आकाशवाणी तर्फे  संगीत स्पर्धा आयोजित केल्या  आहेत.  30 जून 2015 रोजी ज्यांचे वय 16 ते 24  दरम्यान असेल अशा कलाकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. 
           सहभागासाठी संगीतातील विविध प्रकारात हिंदुस्थानी  तसेच कर्नाटक संगीतातील शास्त्रीय गायन, सुगम, लोकसंगीत, संगीत नियोजक, वृंदगान हिंदुस्थानी तसेच उपशास्त्रीय गायन (आकाशवाणीच्या मान्यता प्राप्‍त कलाकारांना किंवा आकाशवाणीच्या कोणत्याही संगीत परीक्षेस बसलेल्या उमदेवारांना  या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.) ही स्पर्धा दोन स्तरांवर घेण्यात येईल. 
            विहित नमुन्यातील अर्ज आकाशवाणी केंद्रात जमा करण्याची अंतिम तारीख 12 जून,2015 पर्यंत राहील. प्राथमिक स्तरावरील स्पर्धा 03 ऑगस्ट,2015 पासून घेण्यात येतील. प्राथमिक स्तरावरील स्पर्धेत ‍निवड झालेल्या उमेदवारांचं  ध्वनिमुद्रण  अंतिम फेरीसाठी पाठवलं जाईल. अंतिम फेरीतील विजेत्यांना  उचित  पुरस्काराने  सन्मानित करण्यात येईल.  या स्पर्धेसाठी भरावयाचा छापील अर्ज जवळच्या आकाशवाणी  केंद्रावर उपलब्ध असून प्रवेश शुल्क रुपये 300/-असे आहे. 
      ईच्छूक  स्पर्धकांनी मुंबईच्या आकाशवाणी  मुंबई केंद्राच्या संगीत विभागातून स्पर्धेचे छापील अर्ज कार्यालयीन वेळेत घेऊन जावेत.  अधिक माहितीसाठी पत्ता : आकाशवाणी  मुंबई केंद्र, चर्चगेट, मुंबई-400 020 दुरध्वनी क्रमांक - 22026242  विस्तार :249/252 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन हेंमत सपकाळे, कार्यक्रम अधिकारी,‍अतिरिक्त  महासंचालक,  आकाशवाणी  केंद्र,  मुंबई यांनी केले आहे.                     
 
Top