उस्मानाबाद - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणारी एमएच-सीईटी परीक्षा गुरुवार, दि 7 मे 2015 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आर. पी. कॉलेज आणि श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज येथे होणार आहे. या परीक्षेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून एकुण 1 हजार 907 विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे असून निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे हे केंद्र प्रमुख असल्याची माहिती जिल्हा संपर्क अधिकारी         डॉ. एन.एस. गंगासागरे यांनी दिली.
सदर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी श्री.तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत श्री. तांबे यांनी परीक्षा आयोजनाबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन कालावधित वैद्यकीय प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्तितीत कॉपीसारखे प्रकार घडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी बैठे व फीरते पथक, विदयार्थ्यांच्या सोईसाठी परीक्षा केंद्र परीसरात आवश्यक ते सूचना फलक लावण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित  यंत्रणेला दिल्या.
 
Top