उस्‍मानाबाद - येथिल  हजरत ख्‍वॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्‍फेअर सोसायटीच्‍या वतीने रविवार रोजी मुस्‍लीम समाजातील सामुहिक वि‍वाह सोहळा मोठया थाटात संपन्‍न झाला.  मुस्‍लीम समाजातील 50 जोडपे वि‍वाहबध्‍द झाले असुन सन 2009 पासुन इज्‍तेमाई शादियॉं (सामुहीक विवाह) वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष नादेरउल्‍ला हुसैनी  यांच्‍या अध्‍यक्षतेखाली करण्‍यात येत आहे.  आतापर्यंत म्‍हणजे सात वर्षामध्‍ये एकुण 307जोडप्‍याचे विवाह संपन्‍न झाले आहे. 
       या वि‍वाह सोहळयामध्‍ये प्रत्‍येक जोडप्‍यास 25 हजार रूपयांचे संसार उपयोगी साहित्‍य वाटप करण्‍यात आले. या विवाह सोहळयाची गेल्‍या तिन महिन्‍यापासुन तयारी करण्‍यात येत होती. हा विवाह सोहळा यशस्‍वी करण्‍यासाठी 50 शिक्षक, 20 काझीसह 800 स्‍वयंसेवक    
तसेच हजरत ख्‍वॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्‍फेअर सोसायटीचे पदाधिकारी यानी पुढाकार घेतला.
मौ. जाफरअली खान, मौलाना शौकत,  नादेरउल्‍ला हुसैनी  ,यानी सामुदायिक विवाह सोहळयाची गरज याविषयी सविस्‍तर उपस्थिताना महत्‍व पटवुन सांगितले.  मौलाना कारी इस्‍माईल साहेब यानी निकाह व दुआ पठण केले. सुत्रसंचालन शार्गीद व तय्यब यानी केले. 


 
Top