उस्मानाबाद - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दि.8  ते 14 एप्रिल, या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागातंर्गत  सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाने पुढाकार घेऊन विविध कार्यक्रमांनी साजरा केला. 
दि. 8 रोजी येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव सभागृहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्त या सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जि. प. अध्यक्ष. कुलदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, प्रा.एम.आर.कांबळे, जि.प. समाज कल्याण सभापती हरिश डावरे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, समाज कल्याणचे  सहायक आयुक्त  एस. के. मिनगिरे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा..कांबळे यांनी संविधान समितीचा मसूदा, वंचित शोषित समाजांचे हित सुरक्षित ठेवणे, लोकप्रतिनिधींनी संविधान समजून घेऊन सामाजिक ममत्व उभे राहण्यास मदत होऊ करणे. या विषयांवर व्याख्यान दिले. 
दि.10 रोजी सामाजीक न्याय विभाग व विशेष सहाय विभाग यांच्यावतीने  डॉ.आंबेडकर   जयंती निमित्त सामाजिक सप्ताहात शासकीय योजनांची माहिती व्हावी, याकरिता प्रसारमाध्यमांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्यायाच्या योजना तसेच विविध महामंडळांच्या योजनांची माहिती यावेळी प्रसारमाध्यमांना देण्यात आली. यावेळी विविध महामंडळाचे व्यवस्थापकांची उपस्थिती होती.  दि.11 रोजी डॉ.आंबेडकर सामाजिक न्यायभवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे रक्तदान शिबीर व व्यसनमुक्ती  कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाची समाज कल्याण सहायक आयुक्त श्री.मिनगीरे यांनी स्वत: रक्तदान करुन सुरुवात केली. . यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. शिरीष बनसोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.‍शीतलकुमार मुकणे,            डॉ. सावळे, डॉ. देशपांडे, डॉ. रसाळ, डॉ. महेश कानडे, डॉ.फुलारी,डॉ. एस. एम. तांबारे हे  उपस्थित होते.
दि.12 रोजी उस्मानाबाद येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमधून -दलित वस्ती -फकिरानगर येथे दलित मित्र शंकर खुने, श्री. बनसोडे, रमाकांत गायकवाड व सहायक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी यांच्या पथकामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेस विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांनी हेरारीने भाग घेतला. त्यानंतर तुळजापूर येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमधून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तुळजापूर, उमरगा आणि कळंब तालुकयातून शासकीय वसतीगृहाती गृहपाल व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.  तुळजापूर येथे शासकीय वसतीगृह अधिकारी श्री.देशंपाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्फत राबविण्यात आला.  
दि.13 रोजी सामाजिक कार्यक्षेत्रातील विचारवंत,चळवळीतील व्यक्ती, कलावंत यांच्या सामाजिक विषयावर प्रबोधनपर व्याख्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी जि. प .अध्यक्ष धीरज पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा पोलीस अधीक्षक  अभिषेक त्रिमुखे, समाजकल्याण सभापती हरीष डावरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्ये,विविध संघटनेचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून मुरुड येथील संभाजी  महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघमारे हे होते. 
दि.14 रोजी  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या  जयंतीनिमित्त या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप जिल्हाभर विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन व समाज कल्याण विभागाकडून अन्न दानाचे वाटप करुन   करण्यात आला. आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, समाज कल्याण सहायक आयुक्त एस.के.मिनगिरे यांनी उस्मानाबाद शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .विविध शासकीय कार्यालयातही डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. 

 
Top