Monday, 20 April 2015

सुप्रिया करपेचे यश

पांगरी - पांगरी (ता.बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु.सुप्रिया सुदर्शन करपे हिने नुकत्याच झालेल्या आयटीएस परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.कु.करपे हिने 150 पैकी 130 गुण प्राप्त करून पांगरी केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.यश प्राप्त केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा जाधव,सरपंच विजय गोडसे,पांगरीचे केंद्र प्रमुख श्रीहरी गायकवाड,मुख्याध्यापक राऊत आदींनी अभिनंदन केले.वर्गशिक्षिका सौ.भोसले,राजमाणे,शिंदे,पाटील,हांगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Labels: