पांगरी (गणेश गोडसे) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 124 वी जयंती पांगरीसह (ता.बार्शी)परिसरात विविध सामाजिक उपक्रमानी उत्साहात साजरी करण्यात आली. 
पांगरी येथे कारी चौकात ज्येष्ठ नागरिक भागवत जानराव,रोहिदास जानराव,लिंबराज जानराव,रंगनाथ जानराव आदींच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेबांना पुस्पहार वाहण्यात आला.तसेच मेणबत्या पेटवून अभिवादन करण्यात आले.यावेळी लक्ष्मण जानराव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहोत्सव समितीचे अध्यक्ष बाबा गायकवाड,खजिनदार मुकेश सोनवणे,रोहित गायकवाड,विष्णु जानराव,अनिल जानराव,समाधान गायकवाड,दिलीप जानराव,सुनील वाघमारे,अभिजीत जानराव,मोहन गायकवाड,कुमार सोनवणे,ऋषिकेश सोनवणे आदि उपस्थित होते.
  पांगरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विजय गोडसे,उपसरपंच सतीश जाधव,जयंत पाटील,ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर आदींच्या उपस्थिती आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
  पांगरी जिल्हा परिषद प्रशालेत मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पांगरीचे केन्द्र्प्रमुख श्रीहरी गायकवाड,मुख्याध्यापक लक्ष्मण काशीद,जनाब खान आदि उपस्थित होते.पांगरीतील राजीव गांधी केंद्रीय निवाशी आश्रमशाळेत संचालिका हौसाबाई बागाडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक रामकृष्ण मुळे,वाहिद शेख,संतोष बगाडे आदि उपस्थित होते.
 
Top