बार्शी - विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त राजविजय क्रीडा,सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या गौतमबुध्द मागासवर्गीय बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने रक्तदान, गायन, शालेय साहित्य वा
टप कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदेश काकडे यांनी दिली.
        मंगळवारी झालेल्या ऐच्छिक रक्तदान शिबीरात १२४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. दि.१८ रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि पांडे चौक येथे युवा गायक आदर्श शिंदे यांच्या गायनाचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, जी.एम.ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, विजय राऊत, रावसाहेब मनगिरे, अरुण बारबोले, भाऊसाहेब काशीद, चंद्रकांत पवार, अभिजीत राऊत, रणवीर राऊत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदेश काकडे, दिपक धावारे, पंडित राजगुरु, मिलींद ताकपिरे, विनोद बोकेफोडे, पिंटू यादव, सूरज नागटिळक, दिनेश राऊत, किरण काकडे, बापू पाटील, रत्नदिप ओव्हाळ, रणजीत चांदणे, गौतम वाघमारे, लखन शिंदे, राहूल कांबळे, विनोद वाघमारे, प्रमोद रिकीबे, नितीन रिकीबे, आप्पा मोहिते, सुदिप पाटील, अजय राऊत, निलेश मस्के, आण्णा भोसले, तेजस कांबळे, सागर लंकेश्वर, पंकज वाघमारे, पप्पू लंकेश्वर, रोहित मोहिते आदी परिश्रम घेत आहेत
 
Top