बार्शी - मुंबईतील वांद्रे येथे शिवसेनेच्या तृप्तीताई सावंत यांनी नारायण राणे यांना धूळ चारुन घवघवीत यश मिळवले या पार्श्‍वभूमीवर बार्शीतील शिवसैनिकांनी पांडे चौक येथे फटाके उडवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रमाणेच भोसले चौक येथे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी मोठी आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी पट्टम पवार, रावसाहेब मनगिरे, अशोक सावळे, नागजी नान्नजकर, नवनाथ चोबे, बाळासाहेब मुढे, राजाभाऊ कळतुंबे, शैलेश माने, पांडूरंग गपाट, बाळासाहेब काशीद, विजय माने, मोहन म्हेतर, एन.आर.कुलकर्णी, आण्णा सुरवसे आदी उपस्थित होते.
 
Top