बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- शिक्षण क्षेत्रातील बदलासोबत शिक्षकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कामातील योगदान मनापासून देणार्‍या गुरुजनांचा आदर्शशिक्षक पुरस्काराने गौरव हा उपक्रम स्तुत्य आणि शिक्षकांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कानडे यांनी केले.
 रविवारी बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली प्रशालेच्या प्रांगणात सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना आदर्शशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले, ज्येष्ठ शिक्षक नेते अंबादास मस्के, वायुपुत्र नारायणराव जगदाळे, हरिदास जाजनुरे, जिल्हाध्यक्ष मुकुंदराज साळुंके, जिल्हा सचिव सचिन झाडबुके, राजाराम शिवशरण, सिल्हर ज्युबिलीचे उपमुख्याध्यापक जयकुमार कुंभारे आदी उपस्थित होते.
यावेळी आदर्श शिक्षक रामचंद्र इकारे (बार्शी), दिलीपकुमार सोपल (वैराग), नागनाथ जाधव (केम), सोमनाथ नाळे (टेंभुर्णी), अशोक धोत्रे (नरखेड), येताळा भगत (मंगळवेढा), सुवर्णा इंगवले (सांगोला), संजय जवंजाळ (तळे हिप्परगा), अभय शेटे (उपरी), आनंदराव पाटील (गुड्डेवाडी), नारायण जाधव (वेळापूर) यांना शाल, श्रीङ्गळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी शिवाजीराव जमाले यांनी शिक्षण प्रवाहातील बदल याविषयी विचार व्यक्त केले. सुवर्णा इंगवले, रामचंद्र इकारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुकुंंद साळुंके, सुत्रसंचलन मोहन गायकवाड यांनी तर आभार निलकंठ लिंगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र मठपती, संतोष नांदेडकर, विजय करजगी आदींनी परिश्रम घेतले.
 
Top