उस्मानाबाद - येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी बुधवार, दि.22 एप्रिल,2015 रोजी सकाळी 10-30 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी  राहुल  कदम यांनी दिली आहे. 
या कार्यशाळेत शासन निर्णयान्वये दुरध्वनी, विदयुत देयके, बदली प्रवास देयक, मेडीकल देयक आदी सारखी हस्तलिखीत स्वरुपात तयार होणारे देयके यापुढे बिलपोर्टल प्रणालीव्दारे हलेक्ट्रॉनीकली तयार करुन कोषागार कार्यालयात दाखल करावयाची असल्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची  माहिती कोषागार विभागातर्फे देण्यात आली आहे.
               
 
Top