स्मानाबाद - महाराष्ट्र राज्य स्थापनेनिमित्त आयोजित महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर 1 मे रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते होणार आहे.  महाराष्ट्र दिनानिमित्त होणारा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्वतयारी प्रत्येक यंत्रणेने काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी महाराष्ट्र दिन कार्यक्रमासंदर्भात पूर्वतयारी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) शिरीष बनसोडे आदींसह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी विविध यंत्रणांना त्यांनी 1 मे रोजी करावयाच्या जबाबदाऱ्यांबद्दल सूचना दिल्या. या जबाबदाऱ्या प्रत्येक यंत्रणांनी सतर्कपणे पार पाडाव्यात कोणतीही हयगय यामध्ये होऊ नये, असे सांगितले. 
महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड ग्राऊंड येथे सकाळी 8 वाजता होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7-10 वाजता तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विविध यंत्रणांनी त्यांच्या विभागांच्या योजनांची माहिती दर्शविणारे चित्ररथ संचलनावेळी ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
महाराष्ट्र दिन कार्यक्रमाची रंगीत तालीम 29 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याने संबंधित यंत्रणांनी त्यापूर्वीच त्यांच्यार सोपविलेली जबाबदारी पार पाडावी, असे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

 
Top