बार्शी - बाराव्या शतकात समतेची शिकवण देतांना क्रांतीकारी विचार आणि कृतींतून समाज परिवर्तन करणार्‍या, जगातील पहिल्या संसदेचे जनक, देशातील पहिल्या आंतरजातीय विवाहाचे प्रणेते, सोलापूर जिल्ह्यात कर्मभूमी असलेल्या जगत्‌ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील विविध सामाजिक संघटना, मंदिरे आणि शासकिय कार्यालयांतून अभिवादन करण्यात आले.   
  बार्शीतील बसवेश्वर मंदिर बार्शीतील बसवेश्वर मंदिर येथे परंपपरागत पध्दतीने पाळण्यात वृषभ (नंदी) ठेवून बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी देवणे परिवाराच्या वतीने विधीवत बसव पूजन, आरती, पाळणा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, अरुण चंद्रशेखर, आप्पासाहेब कथले, माई सोपल, विवेकानंद देवणे, विलास रेणके, प्राचार्य शिवपुत्र धुत्तरगाव, बाबासाहेब कथले, अशोक घोंगडे, रमेश आझरी, अशोक भादुले आणि वीरशैव समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 बार्शी नगरपरिषद
बार्शी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित बसवेश्वर जयंती कार्यक्रमात स्व.जगदाळे मामा सभागृहात जगत्‌ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, आरोग्याधिकारी डॉ.गोदेपूरे, नगरसेवक मुन्ना शेटे, अतुल सोनिग्रा, मनिष चौहाण, कृष्णा उपळकर यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बार्शी तहसिल
बार्शी तहसिलच्या वतीने आयोजित केलेल्या बसवेश्वर जयंती कार्यक्रमात जगत्‌ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसिलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसिलदार उत्तम पवार, वर्षाताई ठोंबरे, शिवा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड्.प्रशांत शेटे, भारताची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, विरेश कडगंची यांचेसह तहसिलचे अधिकारी, कर्मचारी आणि शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा बसवेश्वर चौक 
गवळे गल्ली जवळील महात्मा बसवेश्वर चौक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महेश कुंकूकरी, रत्नाकर खोत, सुनिल जावळी, डॉ.सूर्यकांत घुगरे, प्रकाश मनगिरे सर, भिमाशंकर गुदगे, बसवेश्वर गाढवे, मल्लिनाथ गाढवे, प्रशांत कानडे आदी उपस्थित होते.
मित्रप्रेम युवा ग्रुप,
 आडवा रोडगा रस्ता आडवा रोडगा रस्ता येथे मित्रप्रेम युवा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या शिव-बसव जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती उत्सवमुर्तींचे पूजन आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब आडके, प्रविण घोटाळे, तम्मा दसंगे, विठ्ठल गुडे, अनिल चाबुकस्वार, संतोष व नितीन घोटाळे, जालिंदर देवकर, संतोष शहाणे, राहूल गाढवे, विकास धारुरकर, विकास गुळमिरे, गणेश निंबर्गी, पप्पू केसकर, महेश लुंगारे, मनोज चिंचकर आदी उपस्थित होते.
वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ (लिंगायत बोर्डिंग)
वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ (लिंगायत बोर्डिंग) च्या वतीने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात प्रा.अशोक सावळे यांच्या हस्ते जगत्‌ज्योजी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विश्वस्त रावसाहेब मनगिरे, अशोक मठपती, दादा कोरे, सूरज व अशोक आगळे, उमेश व महेश हिरे, राजा मुलगे, उमेश कारंजकर, आनंद कोरे, सचिन वायचळ, उमेश कोल्हे, मनोज मेनकुदळे, राजेश कानडे, अजय रोडगे, श्री.सुपेकर, श्री.देशमुख, श्री.घंटे, राम यादव, ओंकार, माढेकर आदी उपस्थित होते. 
रोडगा रस्ता (गणेश रोड) 
रोडगा रस्ता (गणेश रोड) येथील महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वरांच्या पुर्णाकृती उत्सवमुर्तीस नगराध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी वाहनांना वीरशैव धर्मातील पंचाचार्यांच्या प्रतिकात्मक हिरवा, तांबडा, निळा, पांढरा, पिवळा अशा पंचरंगी ध्वज लावण्यात आले होते. महात्मा बसवेश्वर महाराज की जय अशा नामघोषात या शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी विलास रेणके, प्रशांत कथले, बाळासाहेब आडके, बंडू वायकर, मल्लिनाथ गाढवे, हर्षवर्धन पाटील, महेश यादव, शिरीष जाधव, अमोल वायचळ, संकेत व सौरभ ढोले, सागर, ओंकार व केदार वायचळ, शाम सगरे, विशाल घोडके, आण्णा लिगाडे, हर्षल होनराव, सुशांत थळपती, गणेश पुराणिक, आयु व प्रेम डोंबे, प्रविण गाढवे, विरुपाक्ष वायकर, संकेत लांडगे, व्याख्यानाचे आयोजन मकात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मंगळवारी दि.२२ रोजी रोडगा रस्ता (गणेश रोड) येथे सायंकाळी ७ वाजता रवि फौंडेशन व पर्यावरणचे मधुकर डोईफोडे यांचे व्यसनमुक्तीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
Top