नळदुर्ग :- लोककवी, भिमशाहीर व महाराष्‍ट्र भूषण वामनदादा कर्डक यांच्‍या 11 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त अणदुर ता. तुळजापुर येथे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण आदरांजली वाहण्‍यात आली.
    आयुष्‍यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या समवेत राहून आंबेडकरी चळवळीला बळ देण्‍यासाठी गाव तेथे जलसा घेऊल लोकांचे संघटन, प्रबोधन व मनोरंजनातून लोक शिक्षण देणार, मोहोळ कार वामनदादा कर्डक यांच्‍या 11 व्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त मौजे अणदुर ता. तुळजापुर येथे जलसा वामनाचा हा आदरांजलीचा कार्यक्रम संपन्‍न झाला.
    या जलश्‍याचे उदघाटक म‍हाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मंत्री व तुळजापुर तालुक्‍याचे आमदार मधुकरराव चव्‍हाण होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून पं. स.सदस्‍य साहेबराव घुगे, सेवानिवृत्‍त समाजकल्‍याण अधिकारी सॉलोमन कांबळे, हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्‍ये काशीनाथ शेटे, अजय अणदुरकर, राजकुमार स्‍वामी, आर. पी. आय चे तालुकाध्‍यक्ष एस. के. गायकवाड मलंग शेख, विजय मोकाशे, आदि मान्‍यवर उपस्थित होते.
     जलसा वामनाचा या कार्यक्रमामध्‍ये फक्‍त वामनदादा कर्डक यांनी लिहलेली गाणी, शाहीरी व पोवाडे गायली. यामध्‍ये नामवंत भिमशाहीर उपस्थित राहून आपली कला सादर केली. त्‍यामध्‍ये अंबादास वाघमारे, (नळदुर्ग) चंद्रकांत शिंदे (सिंदगाव), नागनाथ दुपारगुडे (सराठी) वालचंद कांबळे (नंदगाव), चंद्रकांत बनसोडे (मुळेगाव), यशवंत कांबळे (केशेगाव), सोपान गायकवाड (कणमस), विठ्ठल बनसोडे (मुळेगाव), काशिनाथ कांबळे (दर्गनहळळी), राम वाघमारे (चिवरी), मारुती येरवडे (दोड्डी), रमेश कांबळे (सोलापुर), बबन कांबळे (सोलापुर), नारायण चिमणे (चिवरी‍), पूजा कांबळे (लातुर), लक्ष्‍मण देडे (चिवरी) इत्‍यादी शाहीर उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रबोध कांबळे यांनी केले तर प्रास्‍ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक दयानंद काळुंके यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक आर.एस. गायकवाड यांनी मानले. यासाठी तालुक्‍यातून मोठ्या संख्‍येनी नागरीक उपस्थित होते.
    जलसा वामनाचा कार्यक्रमासाठी दादासाहेब जेटीथोर, लक्ष्‍मण दुपारगुडे, मारुती बागडे, मल्‍लीनाथ जाधव, लक्ष्‍मण सुरवसे, भुजंग पांडागळे, विजय सुर्यवंशी, सावन भंडारे, सोमनाथ साबळे, राम नागविले, काका चंदनशिवे, चंद्रहार ढवळे, मिलींद गायकवाड, महेश बागडे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top