वैराग (महेश पन्‍हाळे) :-  माजी आमदार स्‍व. चंद्रकांत (नाना) निंबाळकर यांच्‍या प्रथम पुण्‍यस्‍मरणानिमित्‍त वैरागमधील पशुवैद्यकीय दवाखान्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या पशुउपचार शिबीरामध्‍ये 400 जनावरांवर उपचार करण्‍यात आले. या शिबीराचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते झाले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जि.प. पक्षनेते मकरंद निंबाळकर हे होते.
         वैराग भागातील सर्वसामान्‍यांचे नेते माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांच्‍या प्रथम पुण्‍यस्‍मरणानिमित्‍त प्रेरणा दिन साजरा करण्‍यात येत आहे. याचे औचित्‍य साधून वैरागमध्‍ये पशुचिकित्‍सा शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबीरामध्‍ये वैराग शहरासह दहीटणे, तडवळे, मुंगशी, सर्जापूर, लाडोळे या गावातील जनावरांवर उपचार करण्‍यात आले. यामध्‍ये 145 जनावरांवर औषधोपचार, 15 जनावरांच्‍या शस्‍त्रक्रिया, 22 जनावरांचे खच्‍चीकरण, 47 जनावरांची वंधत्‍व तपासणी, 59 जनावरांची गर्भ तपासणी, 87 जनावरांचे गोचिड निर्मूलन, 201 जनावरांना जंतनाशके पाजणे अशा 400 जनावरांची तपासणी करुन औषधोपचार करण्‍यात आले. या शिबीरामध्‍ये बार्शी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी एस.एल. शिनगारे, डॉ. पी.जी. गायकवाड, डॉ. एस.आर. गायकवाड, डॉ. आय.डी. शेख यांच्‍यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
         यावेळी माजी नगराध्‍यक्ष विजय बारबाेले, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, उपसभापती केशव घाेगरे, अनिल डिसले, नंदकुमार देशमुख, पं.स. सदस्‍य भाऊसाहेब काशिद, बापू संकपाळ, बापुसाहेब बुरगुटे, सुखदेव जगताप, मोहन घोडके, वैजिनाथ आदमाने आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          
 
Top