विदयार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोटीव्दारे मोफत समुपदेशन
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागाच्यावतीने फेब्रु/ मार्च 2015 मध्ये विज्ञान शाखेतून परीक्षा देत असलेल्या विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना पाल्यांच्या भावी शैक्षणिक करीअर ठरविण्यासाठी शास्त्रीय आधारावर मानसशास्त्रीय कसोटी चाचणीच्या माध्यमातून विदयार्थ्यांची आवड, समयोजन, बौध्दीकस्तर, योग्यता आदी पाहून समुपदेशन करण्यात येणार आहे, त्यासाठी मोफत मानसशास्त्रीय कसोटी चाचणीचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
नाव नोंदणी स्थळ व संपर्क अधिकारी पुढीलप्रमाणे नेमणूका करण्यात आल्या आहेत. श्रीपतराव भोसले हायस्कुल,उस्मानाबादचे सहशिक्षक टी. पी. शेटे, त्यांचा भ्रमणध्वनी क्र- 8806665174 व महात्मा बसवेश्वर विदयालय उमरगा जि.उस्मानाबाद मुख्याध्यापक पवार के. बी. भ्रमणध्वनी क्र- 9421361543 असा आहे. नोंदणी कालावधीत 9 मार्च ते 31 मार्च 2015, मानसशास्त्रीय चाचणीचा दिनांक- इ.10 वी व 12 वी मुलां-मुलींसाठी 6 एप्रिल, मानसशस्त्रीय चाचणीचे स्थळ- उस्मानाबाद येथील श्रीपतराव हायस्कुल येथे घेण्यात येतील, संबधितांनी याची नोंद घ्यावी, असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
Labels: Osmanabad

<< Home